Take a fresh look at your lifestyle.

आता ‘त्या’ जिल्ह्यातही लॉकडाउन; वाचा, काय आहे परिस्थिती

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Advertisement

अशातच आता वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजतापर्यंत संचारबंदी असणार आहे. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

Advertisement

वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. दुकाने, मॉल्स, मार्केट, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा, बंद असतील.

Advertisement

एमआयडीसीतील आस्थापना सुरू राहतील. दुध डेअरी विक्री सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत सुरू राहील.   

Advertisement

दरम्यान राज्यातील प्रख्यात डॉक्टर तात्याराव लहाने यांनी याबाबत दिलासादायक माहिती दिली आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नाही. संसर्गजन्य आजाराचा हवामानानुसार जो चढ उतार आहे त्याचे हे संकेत आहेत.

Advertisement

रुग्णांची संख्या वाढली तरी मृत्यू दर कमी राहील. कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाहीय हात धुणे, मास्क लावणे आणि अंतर ठेवणे हाच उपाय आहे. नवीन कुठलेही लक्षण दिसत नाही हा दिलासा आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply