‘त्या’ पातळीच्या खाली आल्याने वर्षात पहिल्यांदाच आलीय सोने खरेदी करण्याची ‘ही’ संधी; वाचा, काय आहेत ताजे दर
मुंबई :
गेल्या वर्षभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने तेजी होती. लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूकीच्या दृष्टीने पाहत होते. लॉकडाउनच्या काळात वाढलेले दर अजूनही कमी झालेले नव्हते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे.
बजेटनंतरच्या 9 दिवसात सोन्याच्या दरात जवळपास अडीच हजारांपेक्षा जास्त घसरण झालेली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 239 रुपयांनी घसरून 45,568 रुपयांवर बंद झाल्या. जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किंमती खाली आल्या.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, गुरुवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 45,807 रुपयांवर बंद झाले. चांदीही 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली. लॉकडाउन हटल्यापासून लोकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे दुर्लक्ष केले आहे.
चांदीही 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली. पूर्वीच्या मौल्यवान धातूचा बंद भाव 68,093 रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस 1,774 डॉलरवर तर चांदीची किंमत प्रति औंस 26.94 डॉलरवर कायम आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!