Take a fresh look at your lifestyle.

‘या’ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; गहू, ज्वारी व हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लातूर :

Advertisement

सध्या कधी ढगाळ, कधी पावसाचे तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Advertisement

हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे बहुतांश ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच पिकांचेही नुकसान अनेक ठिकाणी झाले आहे. लातूरमध्ये तर थेट काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

Advertisement

शेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो, असा अंदाज सांगितला जात होता. अहमदपूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी गहू, ज्वारी, हरभरा व करडीची पेरणी केली. डिसेंबरमध्ये पडलेल्या दाट धुक्यामुळे ज्वारीवर चिकटा, गव्हावर तांबोरा व हरभऱ्याची फुल गळती झाली.

Advertisement

 अधून – मधून वारा वाहत असल्याने ज्वारी व गव्हाची उभी पिके आडवी पडली.  एवढ्यावरच पाऊस थांबला नाही तर काढणी केलेले आणि काढलीस आलेले गहू, ज्वारी व हरभरा हातचा जातो की काय असे शेतकरी वर्गात सर्वत्र बोलले जात आहे.

Advertisement

उद्याही महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात अजून एखादा दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply