Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : कोरोनाचा ‘असाही’ झाला साईडइफेक्ट; महिलेला कापावी लागली हाताची बोटं

दिल्ली :

Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाउन लागण्याची शक्यता वाढत आहे. अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

Advertisement

अशातच आता लस आलेली आहे. मात्र लस घेऊनही 2 आरोग्यसेवकांना कोरोना झाला असल्याचा प्रकार परदेशात घडल्याचेही वृत्त समोर आले. तसेच लसीवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. दरम्यान कोरोनामुळे एका महिलेवर आता अत्यंत वाईट वेळ आली आहे.

Advertisement

इटलीतील एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या महिलेच्या बोटांना गॅंगरीन झाले होते. परिणामी महिलेच्या हाताची बोटे काळे पडली होती. म्हणून या महिलेची बोटे कापावी लागली. रक्त गोठल्यामुळे या महिलेची बोटं पूर्णपणे काळी पडली होती.

Advertisement

कोरोना विषाणूमुळे या महिलेला गॅंगरीन आजार झाला होता. कोरोनामुळे होणारा गॅंगरीन हा रोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. हे प्रकार कमी ठिकाणी घडले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात साथ आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement

राज्यातील रुग्णवाढ ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यासह मुंबईत झालेली रुग्णवाढ स्थानिक पातळीवरील आहे. सहवासितांचा शोध आणि निदान या दोन सूत्रांद्वारे हा संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply