Take a fresh look at your lifestyle.

पतंजलीचे नवीन औषध लॉंच; रामदेव बाबांचा पुन्हा अजबच दावा, अवघ्या ‘एवढ्या’ दिवसांत कोरोना रुग्ण होणार बरा

मुंबई :

Advertisement

करोना विषाणूवर १०० टक्के प्रभावी औषध असल्याचा दावा करून पतंजली कंपनीने कोरोनील नावाचे औषध बाजारात आणले होते. मात्र, त्यावरून मोठा गहजब उडाला होता. कोणत्याही क्लिनिकल ट्रायल न घेताच असे औषध १०० टक्के प्रभावी असल्याच्या मुद्याची दखल घेऊन देशभरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

Advertisement

आता पुन्हा एकदा एक नवीन ‘कोरोनिल टॅबलेट’ औषध लॉन्च करत रामदेव बाबांनी एक अजब दावा केला आहे. पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा यांनी कोविड-१९ वर पुन्हा एक नवं औषध लॉन्च केलं आहे. शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी हे औषध लॉन्च केलं.

Advertisement

यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. याच दरम्यान बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर रुग्ण 3 दिवसांत बरा होतो असा देखील दावा केला आहे.

Advertisement

बाबा रामदेव यांनी घोषणा केली की पतंजलीच्या कोरोनिल टॅबलेटमुळे कोव्हिडवर उपचार होतील. बाब रामदेव यांनी असा दावा केला आहे की, आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला एक सहाय्यक औषध म्हणून मंजूरी दिली आहे.

Advertisement

या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने GMP म्हणजेच ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’चे प्रमाणपत्र दिले आहे. कोरोनावरील हे औषध एव्हिडन्स बेस्ड असल्याचाही दावा करण्यात आला आहे. हे औषध लॉन्च करताना त्यांनी एक रिसर्च बूक सुद्धा लॉन्च केलं आहे. अशाच प्रकारचे १६ रिसर्च पेपर अद्याप रांगेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply