Take a fresh look at your lifestyle.

कमी वयात केस देताहेत दगा; पांढर्‍या केसांवर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

मुंबई :

Advertisement

बैठी आणि कमी कष्ट असणारी जीवनशैली, खान-पान क्रियेकडे दुर्लक्ष, तनाव, अपूर्ण झोप अशा अनेक बाबींमुळे आपल्या व आपल्या मुलांच्या शरीरात अनेक पौष्टिक घटक जात नाहीत. शरीराला पौष्टिक घटक न मिळाल्यास आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात.

Advertisement

अशाच परिणाम आपल्या केसांवर होत असतो. आजकाल लहान मुलांमध्येही केस पांढरे होण्याची समस्या दिसू लागली आहे.

Advertisement
  1. त्रिफळा चूर्ण – याच्या सेवनाने नवीन सेल्सच्या निर्मितीसाठी फायदा होऊ शकतो. त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण आणि आवळ्याचे चूर्ण पाण्यात मिसळून सेवन करावे.
  2. कांदा – केसांना कमी वयातच पांढरे होण्यापासून थांबविण्यासाठी हा गुणकारी घरगुती उपाय आहे. रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी. पांढऱ्या केसांच्या समस्येतून मुक्त होण्याबरोबरच केसांच्या वाढीसाठीदेखील मदत होते. सूचना – वरील सर्व उपाय करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
  3. कढीपत्ता – साधारणपणे मोठ्या वाटीत कढीपत्ता उकळवून घ्या. आणि मग पाणी थंड करायला ठेवा. पाणी थंड/कोमट झाले की प्या. रोज हा उपाय केल्यास नक्कीच बदल जाणवेल. फक्त असे पाणी पिण्यात सातत्य असावे.
  • लिंबू – एका ग्लासमध्ये लिंबू पिळावे आणि त्यात आवळा पावडर घ्या. चांगले ढवळून घ्या. मग हे मिश्रण प्या. हा उपाय सकाळी करावा. केस तुटणे, केसांना इजा पोचणे आणि केस पांढरे होण्यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

संपादन : संचिता कदम

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply