Take a fresh look at your lifestyle.

फोटोस्टेशन : ‘महाराष्ट्र केसरी’च्या निवड चाचणीत रंगतदार कुस्त्यांचा थरार..!

अहमदनगर :

Advertisement

64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने निमगांव वाघा (ता. नगर) येथे नगर तालुकास्तरीय निवड चाचणी उत्साहात पार पडली. यावेळी मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते. कोरोना महामारीमुळे तब्बल एक वर्षानंतर गावात कुस्तीचा आखाडा रंगल्याने ग्रामस्थ व कुस्ती रसिकांनी कुस्ती मल्लांना उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.

Advertisement

यामध्ये विजयी मल्ल गादी विभागसाठी महेश शेळके, बुध्दभूषण साळवे, सौरभ शिंदे, संदीप डोंगरे, वैभव फलके, अविनाश मोरे, लौकिक चौगुले, युवराज कर्डिले, माती विभागसाठी वैभव चोपडे, सौरभ मराठे, अक्षय उघडे, विकास गोरे, शुभम वाघ, सुजीत कांडेकर, मनोज फुले तर महाराष्ट्र केसरी गटासाठी मनोहर कर्डिले (माती) व सुदर्शन कोतकर (गादी) या मल्लांची जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहे. या निवडचाचणीसाठी पंच म्हणून पै.गणेश जाधव व प्रियंका डोंगरे यांनी काम पाहिले.

Advertisement

नवनिर्वाचित सरपंच रुपाली विजय जाधव यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन व  कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, उपसरपंच अलका गायकवाड, देवाचे भगत नामदेव भुसारे, उद्योजक गोकुळ जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, अनिल डोंगरे, हर्षवर्धन कोतकर, डॉ. विजय जाधव, सचिव बाळू भापकर, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ जाधव, किरण जाधव, पोपट शिंदे, भागचंद जाधव, कोंडीभाऊ फलके, मुन्नाबी शेख, धनंजय खर्से, सोमनाथ राऊत, किसन वाबळे, चंद्रकांत पवार, सुखदेव जाधव, भानुदास ठोकळ, अतुल फलके, लक्ष्मण चौरे, मयुर काळे, विठ्ठल जाधव, रंगनाथ शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

सरपंच रुपाली जाधव यांनी गावाला उत्कृष्ट कुस्ती मल्लांची परंपरा असून, अनेक खेळाडू गावातून घडले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी देखील प्रोत्साह देण्यात येणार असल्याचे सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी कोरोनामुळे कुस्तीच्या सरावात व स्पर्धेत तब्बल एक वर्षाचा खंड पडला. कुस्तीपटूंनी आपले सराव सुरु ठेऊन होणार्‍या स्पर्धेत गावाचे नांव उज्वल करण्याचे आवाहन केले.
या निवड चाचणीत नगर तालुक्यातील मल्लांचा उत्सफुर्त सहभाग लाभला. राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply