Take a fresh look at your lifestyle.

शिवरायांचे विचार आजही दिशादर्शक; किरण काळे यांचे मत

अहमदनगर :

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

Advertisement

शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते. 

Advertisement

यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, डॉ.मनोज लोंढे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रवीण गीते, अन्वर सय्यद, मुबीन शेख, सुजित जगताप, निखिल गलांडे, नलिनी गायकवाड, कौसर खान, नीता बर्वे, सुनिता बागडे, उषा भगत, जरीना पठाण, ऋतिक शिरवाळे आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. 

Advertisement

नगर शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते काम करत असताना महाराजांच्या लोकांच्या सेवेच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असतात. हे काम करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेत काम करण्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमी असते, असे यावेळी काळे म्हणाले.

Advertisement

कॅ.रिजवान शेख, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, ॲड.सुरेश सोरटे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, फहिम इनामदार ऋषिकेश चितळकर, वैभव कांबळे, शिवम करांडे, अनविश गुंड, तन्मय सांगळे, ओम जगताप, तन्मय गुंड, संकेत गवळी,अमित गुंड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply