Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आणि कसे होणार कमी; वाचा, कधी मिळणार इंधनदर वाढीपासून दिलासा

मुंबई :

Advertisement

देश आणि जगात पेट्रोल आणि डिझेल किंमती आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. भारताबद्दल बोलायचं झालं तर बर्‍याच राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. हे प्रथमच घडत आहे, जेव्हा ग्राहकांना एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपये खर्च करावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीतील बदलाचा निश्चितच भारतीय बाजारात परिणाम होत आहे. यावर्षी जानेवारीपासून ब्रेंट क्रूडच्या किंमतीत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

यावेळी पेट्रोल 6.17 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 6.4 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे. येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीपैकी सुमारे 70 टक्के किंमत कर आणि उपकर आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल हे केंद्र आणि राज्य सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. गेल्या 3 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सुमारे 14 लाख कोटींची कमाई केली आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलवर ग्राहकांना त्वरित सहा रुपये / लीटरवर त्वरित दिलासा दिला जाऊ शकतो, असे ऊर्जा तज्ज्ञांचे मत आहे. मात्र राज्य आणि केंद्र सरकार असे करणार नसल्याची शक्यता जास्तच आहे.   

Advertisement

भारतासह जगातील सर्व देश अनलॉक आणि लसीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहेत. अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, कार्यालये, प्लांट व इतर संस्था पूर्ण संख्येने सुरू होऊ लागल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचीही मागणी वाढेल. आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. म्हणजेच महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

नरेंद्र तनेजा म्हणतात, सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे मर्यादित पर्याय आहेत. यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे कोरोना साथीची आव्हाने, अर्थव्यवस्थेला चालना देणे. सरकारांनी उत्पादन शुल्क आणि व्हॅट वाढवून महसूल वाढवण्याचे काम केले तेव्हा ग्राहकांनी पाठिंबा दर्शविला. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी अवस्थेत असल्याने ग्राहक नाराज आहेत, अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply