Take a fresh look at your lifestyle.

२५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना, भाजप नेत्यांनाही क्लीनचिट; वाचा, हे प्रकरण थोडक्यात

कोल्हापूर :

Advertisement

२५ हजार कोटींच्या राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ जणांना क्लीनचिट मिळाली आहे.  या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजपाचे विजयसिंह मोहिते पाटील यांचीही नावे होती.

Advertisement

ब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या चौकशी समितीने या संचालकांना क्लीनचिट दिली आहे. २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने हे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या मंडळावर अजित पवारांसह हसन मुश्रीफ यांच्यासारखी काही नेते होते.

Advertisement

या घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात आयपीसी 420, 506, 409, 465 आणि 467 कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला होता.  समितीने त्यांचा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे, त्यामुळे सहकारी बँक घोटाळ्यात अडकलेल्या नेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Advertisement

 २००५ ते २०१० या काळात बँकेत मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करण्यात आले. यापैकी अधिकतर कर्ज हे साखर कारखाने आणि सूत बनविणाऱ्या कारखान्यांना देण्यात आले होते. हे कर्ज देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. काही नेत्यांच्या कारखान्यांना हे कर्ज देण्यात आले होते. मात्र, हे कर्ज वसूल करण्यात अपयश आले होते. यामुळे बँकेचे नुकसान झाले असा आरोप करण्यात आला होता.

Advertisement

यानंतर मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, विनाकारण मला राजकीय द्वेषभावनेतून अडकवण्याचा प्रयत्न केला होता, राज्य बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नसताना राजकीय द्वेषातून मला जाणीवपूर्वक गुंतवले होते.

Advertisement

ज्यावेळी या कारवाईसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, पांडुरंग फुंडकर, शेकापचे जयंत पाटील आदी नेते चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेले, त्यावेळी पाटलांनी ही कारवाई फक्त हसन मुश्रीफ यांना अडकवण्यासाठी केली असल्याचं धडधडीतपणे सांगून टाकले असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply