Take a fresh look at your lifestyle.

केंद्राचा ‘आखडता हात’ म्हणत शिवसेनेने सांगितली महाविकास आघाडी सरकारच्या हाताची ‘पोहोच’; वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात

मुंबई : 

Advertisement

आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात शेतकर्‍याची अवस्था सांगताना केंद्र सरकार मदतीत कसे मागे आहे, याचा हलका उल्लेख केला आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

Advertisement

आता दुसऱयांदा पावसाचा तडाखा बसल्याने कसेबसे वाचलेले पीक हातातून जाते की काय, अशी भीती शेतकऱयांना वाटणे साहजिक आहे. आधीच या वर्षी थंडीने लपंडाव केला.

Advertisement

कधी गारवा तर कधी उष्मा, कधी अवकाळीचा शिडकावा तर कधी तडाखा. खरीपाचे पीक गेले तर रब्बीचे घेऊन कसर भरून काढू या आशेने बळीराजा प्रत्येक वेळी शेतीचे ‘पुनश्च हरिओम’ करतो. कष्टाने, मेहनतीने शेत हिरवेगार करतो. पिकेदेखील छान डोलू लागतात.

Advertisement

मात्र सगळे सुरळीत सुरू असतानाच अवकाळीची कुऱ्हाड या डोलणाऱया पिकांवर पडते. उभे पीक आडवे होते आणि शेतकऱयाच्या आशादेखील डोळय़ातील अश्रूंसोबत वाहून जातात. कधी अतिवृष्टी, कधी महापूर, कधी चक्रीवादळ, तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती गेल्या काही वर्षांपासून सापडली आहे.

Advertisement

मागील वर्षात काय किंवा आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला काय, निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव महाराष्ट्राला सातत्याने येत आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी म्हण आहे, पण अलीकडील काळात राज्यासाठी ‘पावसाचा तेरावा महिना’ अशी नवीन म्हण रूढ होण्याची भीती आहे.

Advertisement

त्याची कारणे काय असतील ती असतील, पण शेवटी उद्ध्वस्त होतो तो सामान्य शेतकरीच. ना खरीपाचे पीक मिळते ना रब्बीचा हंगाम हाताशी येतो. जे काही पिकते ते अवकाळी आणि गारपीट यांच्या तडाख्यात नष्ट होते.

Advertisement

गेल्या महिन्यात तेच झाले. आता दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळीची ‘वक्र’वृष्टी होत आहे. केंद्राचा ‘आखडता हात’ राज्यातील शेतकऱयांपर्यंत पोहोचत नसला तरी राज्य सरकारच्या मदतीचा हात प्रत्येक अवकाळीग्रस्त शेतकऱयापर्यंत पोहोचत असतोच.

Advertisement

आताही राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलच, पण निसर्गाची लहर कशी थोपविणार हा प्रश्न शेवटी उरतोच. पर्जन्यराजा हा शेतकऱयाचा मायबाप, पण तोच अवकाळीची ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply