Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तिने पाठवले महिला न्यायाधीशाच्या घरी दीडशे कंडोम; वाचा, ‘नेमका’ काय होता न्यायाधीशाचा निर्णय

मुंबई :

Advertisement

लोक केव्हा काय करतील, हे सांगणे अशक्य असते. कारण बर्‍याचदा निषेधाची प्रक्रिया ही उस्फूर्त असते. परिणामी लोक काहीतरी वेगळ्या गोष्टी करून जातात. त्याचे परिणाम लगेच दिसत नसले तरी कालांतराने दिसतात.

Advertisement

अशीच एक घटना आता समोर आली आहे. या ना त्या कारणाने चर्चेत असणारे गुजरात आता एका वेगळ्याच मॅटरमुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा व्ही. गनेडीवाला यांनी एक निकाल दिला होता. जो फारच चर्चेत आला.

Advertisement

‘अल्पवयीन मुलीचा हात पकडणं आणि तिच्यासमोर एखाद्या पुरुषानं पँटची झिप उघडणं गुन्हा नाही. तसंच अल्पवयीन मुलीच्या छातीवर असलेल्या कपड्यांना स्पर्श करणं हा गुन्हा नाही. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार ठरू शकतो’, असा निकाल त्यांनी दिला होता.

Advertisement

या निकालाच्या समर्थनार्थ कमी आणि विरोधात जास्त बोलले गेले. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेने न्यायमूर्ती गनेडीवाला यांना थेट दीडशे कंडोम पाठवले.

Advertisement

एका महिलेनं त्यांच्या या निकालांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयाच्या पत्त्यावर दीडशे कंडोम पाठवले आहेत. जर स्कीनचा स्कीनशी स्पर्श झाला नाही तर तो लैगिक अत्याचार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून कंडोमचा वापर केल्यावरही स्कीन टच होत नाही, तर हा देखील लैगिक अत्याचार नाही म्हटला जाणार का? असं कंडोम पाठवून त्यांना विचारायचं असल्याचं त्या महिलेनं म्हटलं.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply