Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : आता ‘त्या’ मंत्र्यांनाही कोरोनाने घेरले; 2 दिवसात महाविकास आघाडीचे 3 मंत्री कोरोनाबाधित

पुणे :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

Advertisement

अशातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही करोनाने गाठले आहे. टोपे यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. टोपे हे पहिल्यापासून फील्डवर उतरून काम करत होते.

Advertisement

ज्या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला, त्या दिवसापासून तर आजपर्यंत आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे हे कोरोनाच्या लढाईत यंत्रनेसोबत होते. मधल्या काळात त्यांच्या आईचेही निधन झाले. मात्र त्यानंतरही दुखातून स्वत:ला सावरत टोपे यांनी आपल्या कामाचा तडाखा सुरूच ठेवला. आजपर्यंत ते जनतेसाठी लढत होते. अखेर आता त्यांनाही कोरोनाने गाठले आहे.

Advertisement

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी’, असे ट्वीट राजेश टोपे यांनी केले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply