Take a fresh look at your lifestyle.

टाईम मॅगझिनने जाहीर केली 100 प्रभावी युवा नेतृत्वांची यादी; वाचा, कोणत्या 5 भारतीय व्यक्तींचा झाला समावेश

दिल्ली :

Advertisement

जगातील प्रसिद्ध अशा मॅगझिन ‘टाइम मॅगझिन’ ने बुधवारी जगातील विविध क्षेत्रातील 100 प्रभावशाली हस्तींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये ‘भीम आर्मी’ चे संस्थापक आणि ‘आझाद समाज पार्टी’चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भारतीय वंशाच्या अन्य 5 व्यक्तींनाही या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

Advertisement

‘टाइम मॅगझिन’ने बुधवारी जाहीर केलेल्या ‘2021 टाइम 100 नेक्स्ट’च्या यादीमध्ये चंद्रशेखर आझाद सोडून भारतीय वंशाच्या इतर नामांकित व्यक्तींमध्ये’ इन्स्टाकार्ट ‘चे संस्थापक आणि सीआईओ अपूर्व मेहता,’ पीपीआय एनजीओ ‘च्या कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि ‘अ‍ॅप्सल्व एनजीओ’ चे रोहन पावुलुरी, ट्विटरचे वकील विजया गडदे आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक यांचा समावेश आहे.

Advertisement

यावेळी, ‘टाईम 100’ चे संपादक डॅन मॅकसाई म्हणाले की, या यादीतील प्रत्येकजण इतिहास घडविण्यासाठी तयार आहे. यापैकी काही असे आहेत ज्यांनी यापूर्वी इतिहास घडविला आहे.

Advertisement

भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी टाईम मासिकाने म्हटले आहे की, दलित समाजाला दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी ते शिक्षणाच्या माध्यमातून शाळा चालवतात आणि ते आक्रमकही आहेत. ते जीप दुचाकीवर बसून जातीनिहाय हिंसाचाराच्या बळींचा बचाव करण्यासाठी खेड्यात जातात आणि भेदभावाविरूद्ध ‘उत्तेजक’ निदर्शने करतात. भीम आर्मीनेही हाथरस बलात्कार प्रकरणात न्यायासाठी मोठी मोहीम राबविली होती.

Advertisement

यूपीच्या सहारनपूर जिल्ह्यातील छुटमलपूरमधील ‘घाडकोली’ खेड्याचे चंद्रशेखर आझाद रहिवासी आहेत. त्यांनी देहरादून येथून कायद्याचा अभ्यास केला आहे. 2015 मध्ये त्यांनी ‘भीमा आर्मी भारत एकता मिशन’ ची स्थापना केली. मे 2017 मध्ये, शब्बीरपूर गावात जातीय हिंसाचार झाला तेव्हा ‘भीम आर्मी’च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. याच काळात चंद्रशेखर प्रथम चर्चेत आले. तुरुंगातून सुटल्यानंतरही चंद्रशेखर यांनी हे अभियान चालू ठेवले आणि दलितांवरील अत्याचाराविरोधात जोरदार आवाज उठवायला सुरुवात केली.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply