Take a fresh look at your lifestyle.

IMP News : ‘त्याद्वारे’ केली जातेय राम मंदिराच्या देणगीमध्येही फसवणूक..!

पुणे :

Advertisement

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी सध्या देशभरातून मोठ्या प्रमाणात निधी स्वीकारला जात आहे. त्यातही अनेकांनी आपला गोरखधंदा शोधला आहे. काहींनी बनावट वेबसाईट, पावत्या आणि क्यूआर कोड यांच्या मदतीने मंदिराच्या नावे देणग्या घेऊन फसवणूक करण्यास सुरुवातही केली आहे.

Advertisement

दै. भास्करच्या प्रश्नांना श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काहींनी ट्रस्टसारख्या पावत्या छापून घेतल्या, मिळत्याजुळत्या नावांनी वेबसाइट बनवल्या, बँक खातीही उघडली आहेत. ही बाब पूर्णपणे खरी आहे. अयोध्येत मी स्वत: गेल्या मेपासू आतापर्यंत ४-५ एफआयआर दाखल केल्या आहेत. ३० जानेवारीला ट्रस्टच्या नावातून एक अक्षर हटवून बनावट वेबसाइट तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

आतापर्यंत ८-१० एफआयआर नोंदवल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरही पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. जेथे ८-१० लाख कार्यकर्ते फिरून देणग्या घेत आहेत तेथे १०-१५ लोकांनी घोळ केल्यास ते समुद्रातील एका थेंबाइतकेही नाही. मी त्याला गांभीर्याने घेत नाही. कारण, देश गंभीर आहे, तरीही घोटाळे होतच आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

आम्ही यूपीआय व बारकोडद्वारे समर्पण निधी घेणे बंद केले आहे. कारण ती यत्किंचितही विश्वासार्ह नाही. तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांनी सांगितले आहे की त्यात घोळ केला जाऊ शकतो, असेही चंपत राय यांनी म्हटले आहे.

Advertisement

 ट्रस्टची केवळ ३ खाती आहेत. ती स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ बडोद्यात आहेत.  गोंधळ केला जाऊ शकत नाही अशी काही व्यवस्था सरकारने केलीही असेल. पण आमचे बँकवाले म्हणतात की यूपीआय आणि बारकोडमध्ये गोंधळ केला जाऊ शकतो, असेही राय यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply