Take a fresh look at your lifestyle.

‘तिथे’ भाजपचा उडाला पुरता धुव्वा; पहा काय झालीय केविलवाणी परिस्थिती

दिल्ली :

Advertisement

पंजाब राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पार्टी (आप), शिरोमणी अकाली दल आणि भाजपचा धुव्वा करत काँग्रेसने सात महापालिका आणि १०९ नगर परिषदांच्या निवडणुकीत जोरदार विजय मिळवला आहे.

Advertisement

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन जोमात असताना झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी सगळ्यांना धक्का देणारे निकाल दिले आहेत. त्यामुळे आता भाजपतर्फे यावर कोणती मोर्चेबांधणी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे भाजप खासदार व सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व २९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. आठ महापालिका आणि १०९ नगर परिषदा-नगर पंचायतींसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले होते. त्याचा निकाल १८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आहे.

Advertisement

काँग्रेसने अबोहर, बठिंडा, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, मोगा आणि बाटला या प्रमुख पालिकेत विजय मिळवला आहे. निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रदेश काँग्रेसचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

भटिंड्यात ५३ वर्षांत प्रथमच काँग्रेसचा महापौर होईल. फिरोजपूरच्या सर्व ३३ प्रभागांत काँग्रेसला विजय मिळाला आहे. असे प्रथमच घडले आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी दिलासादायक आहेत, तर आम आदमी पार्टी, भाजप आणि अकाली दलासाठी निराशाजनक आहेत. पुढील वर्षी या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply