Take a fresh look at your lifestyle.

३०६ पैकी २८६ मार्केट कमिट्या निद्रिस्त; आधुनिकीकरणाच्या नियमांना बाजार समित्यांचा हरताळ..!

पुणे :

Advertisement

बाजार समित्या सहकारी पाहिजे की खासगी यावरून देशभरात मतमतांतरे आहेत. सध्या दिल्लीतील आंदोलनात सहकारी संस्थांची सिस्टीम शाबित ठेवण्यासह हमीभावाचे कवचकुंडले शाबित ठेवण्यासाठी आंदोलन चालू आहे. तर, इकडे महाराष्ट्रातील ३०६ पैकी २० बाजार समित्याच फ़क़्त आधुनिकीकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करीत असल्याचे वास्तव आहे.

Advertisement

राज्यातील बाजार समित्यांनी भुसार मार्केटच्या आवारामध्ये धान्य चाळणी यंत्र आणि आर्द्रता मीटर बसवणे बंधनकारक आहे. पणन संचालक सतीश सोनी यांनी याबाबतचे पत्र सर्वच बाजार समित्यांना पाठवले आहे. तसेच यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ई-नाम व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून असे यंत्र अनुदान तत्वावर बसवण्याची योजना आहे.

Advertisement

मात्र, आधुनिकीकरण आणि शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेऊन फ़क़्त राजकीय अड्डा म्हणून बाजार समित्यांची जोपासना केली जात आहे. त्यामुळेच असे दोन्ही महत्वाचे यंत्र बसवणे आणि त्याचा कार्यक्षमतेने वापर करणे ही आवश्यकता आहे.

Advertisement

अनुदान योजना असूनही आता कुठे पणन संचालकांनी पत्र पाठवून निर्देश दिल्यावर काही बाजार समित्यांना जाग आलेली आहे. ८५ बाजार समित्यांनी अनुदानाच्या योजनेतून अशी अत्याधुनिक यंत्र बसवण्यात स्वारस्य दाखवले आहे. त्याचवेळी जिथे २० ठिकाणी अशी यंत्र आहेत. तिथेही त्यांचा कार्यक्षमपणे वापर नसल्याचे पणन संचालकांना आढळले आहे.

Advertisement

धान्य चाळणी यंत्राचे उपयोग :

Advertisement
  1. काडीकचरा साफ करणे
  2. खडे व छोटे दगड बाजूला काढणे
  3. दर्जेदार असे धान्य वेगळे करणे

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply