अहमदनगर :
शेतकरी हा कसा सर्वच राजकीय पक्षांसाठी तोंडी लावण्याचा विषय आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाची ठोस दखलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेली नाही. तर, राज्यात हमीभाव आणि शेतीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार चुप्पी साधून आहे. त्याच ठाकरे मंत्रिमंडळाला आता शेतकऱ्याने चक्क मरणाच्या म्हणजे उस पेटवण्याच्या सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
ही घटना नेवासा तालुक्यातील सोनई या गावाची आहे. येथील शेतकरी ऋषिकेश शेटे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह त्यांच्या सहकारी साखर कारखान्यावर अनेक गंभीर आरोप या उस उत्पादक शेतकऱ्याने केले आहेत. शेतकऱ्याचा उस हाच उत्पन्नाचा स्त्रोत आहे. राजकीयदृष्ट्या त्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप केलेला आहे.
मुळा सहकारी साखर कारखान्याकडून वेळेवर उसाची तोड केली जात नाही. तसेच येथे फ़क़्त शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. मंत्री गडाख हे शेतकऱ्यांना लक्ष्य करतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारच्या कृपेने आमच्यावर आलेली ही वेळ लक्षात घेऊन आम्ही उस पेटवणार आहोत. तसेच त्याच उसामध्ये होणारा शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी येण्याचे निमंत्रण शेटे यांनी दिले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम