Take a fresh look at your lifestyle.

‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ही विनामुल्य; आयएनएफएसचा पुढाकार

मुंबई : 

Advertisement

देशातील सर्वात मोठी फिटनेस सर्टिफिकेशन इन्स्टिट्यूट आयएनएफएस या संस्थेने विनामूल्य ‘बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ सुरु केला आहे. याद्वारे लोकांना पोषण आणि आरोग्याविषयी माहिती मिळण्यास मदत होईल. नवशिक्यांसाठी फिटनेस व आरोग्यामागील शास्त्र अगदी सोप्या पद्धतीने समजवून सांगणे व यासंबंधी पार्श्वभूमी तयार करणे हा ‘ बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्स’ चा उद्देश आहे.

Advertisement

या बेसिक मोफत कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पोषण, आहार आणि व्यायामाची मूलभूत तत्त्वे तर शिकता येतीलच, पण यासोबतच, स्वत:चा आहार आणि कामांचा आराखडाही तयार करता येईल. आयएनएफएसच्या विद्यार्थ्यांना अनुभवी प्राध्यापकांशी संपर्क साधता येईल. बेसिक न्युट्रिशन व फिटनेस कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आयएनएफएसच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यांना तज्ञांमार्फत विविध कॉलेज व विद्यापीठांतून प्रशिक्षण दिले जाईल. या सर्वांना आयएनएफएसकडून सर्टिफिकेशन मिळेल.

Advertisement

संस्थापक ज्योती दबसम्हणाल्या की, आयएनएफएसमध्ये कुशल फिटनेस व्यावसायिक तयार करण्यासाठी आम्ही अनेक ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स प्रदान करत आहोत. याद्वारे हजारोंचे आयुष्य उंचावत आहोत. आयएनएफएसमध्ये आम्ही पहिला मोफत कोर्स लाँच करण्याचे ठरवले तेव्हा, पोषण आणि आरोग्याची मूलभूत शास्त्रीय तत्त्वे नवशिक्यांना समजावून सांगणे, हाच यामागील अजेंडा होता. आरोग्याप्रती उत्साही असलेल्या प्रत्येकाला परवडेल असा हा बेसिक कोर्स प्रदान करत आम्ही एक परिवर्तन घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत. यासाठी संकेतस्थळावर (https://infs.co.in/ ) संपर्क साधावा.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply