पुणे / जळगाव :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर वन विभागातर्फे देवराई साकारण्यासाठीचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जळगाव येथील जैन उद्योग समूहातर्फे सामाजिक बांधिलकी जपत पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सामग्री बसवण्यात आली आहे.
गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी पक्षी थांबे होण्यासाठी फळ असणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभूळ आदी विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ, फुलांची झाडे असणार आहे. त्यासाठी ठिबक सिंचन करण्यात येत आहे.
जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण केल्यावरही ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. ही अडचण दूर व्हावी यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्याबाबत मागणी केल्यावर जैन समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार हे महत्वाचे काम पुढे जात आहे.
जैन समूहाचे तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानुसार अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे २५ एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड हाेेणार आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य