Take a fresh look at your lifestyle.

उपग्रहाच्या मदतीने कळणार शेती व पिकाचे वास्तव; उत्पादनाचाही कळणार अंदाज..!

पुणे / औरंगाबाद :

Advertisement

तंत्रज्ञानाचा शिरकाव आता सगळ्याच क्षेत्रात झालेला आहे. अशावेळी शेतीच्या क्षेत्रातही आता थेट उपग्रहाचा वापर वाढत आहे. आता तर एका भारतीय संशोधकांनी एक असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्याच्या मदतीने अगदी उपग्रहाचा वापर करून आपलायला शेती आणि पिकाचे फ़क़्त वास्तव समजणार नाही, तर उत्पादनाचा अंदाज बांधता येणार आहे.

Advertisement

उपग्रहाद्वारे माती परीक्षण, पाणी गुणवत्ता तपासणी, पीक प्रकार ओळखणे, पीक आरोग्य तपासणी, पीक उत्पन्नाचा अंदाज लावणे, दुष्काळाची तीव्रता तपासणे आणि नैसर्गिक आपत्तीचे विश्लेषण करणे यावर प्रा. डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना पेटंट मंजूर झाले आहे. डॉ. काळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानशास्त्र विभागामध्ये सेवेत आहेत.

Advertisement

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (डीएसटी) जिओस्पेशल टेक्नॉलॉजी या जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. काळे काम करीत आहेत. या संशोधनात त्यांच्या मार्गदर्शनात महेश सोलंकर आणि धनंजय नलावडे या संशोधक विद्यार्थ्यांनीही काम केले आहे.

Advertisement

भारत सरकारच्या अवकाशातून माती परीक्षण, पाणी गुणवत्ता तपासणी, पीक प्रकार ओळखणे, पीक आरोग्य तपासणी, पीक उत्पन्नाचा अंदाज लावणे, दुष्काळाची तीव्रता तपासणे आणि नैसर्गिक आपत्ती विश्लेषण करणे यासारख्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी हे संशोधन फायदेशीर ठरणार आहे.

Advertisement

डॉ. काळे यांनी नेमके काय केलेय ?

Advertisement

हेपरस्पेक्टरल इमेजचे विश्लेषण अधिक सुलभ करण्यासाठी हेपरस्पेक्टरल इंडमेम्बर एक्स्ट्रॅक्शनचे अचूक तंत्रज्ञान डॉ. काळे यांनी विकसित केले आहे. यामुळे पृथ्वीच्या भूभागावरील कोणत्याही पदार्थांचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण व वर्गीकरण करणे शक्य होणार आहे.

Advertisement

हेपरस्पेक्टरल इंडमेम्बर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय ?

Advertisement

अवकाश तंत्रज्ञानामुळे हेपरस्पेक्टरल इमेजेसचा उपयोग करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक पदार्थांचा अभ्यास करणे सुलभ झाले आहे. हेपरस्पेक्टरल इमेजेसमध्ये मानवी डोळ्यांना न दिसणारी प्रचंड अशी माहिती संकलित केली असली तरी या माहितीचे अचूक विश्लेषण करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये विविध पदार्थांच्या प्युअर स्पेक्टरल सिग्नेचर शोधून काढणे एक जागतिक दर्जाची समस्या आहे. या तांत्रिक भाषेमध्ये हेपरस्पेक्टरल एन्डमेम्बर या नावाने ओळखले जातात. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply