औरंगाबाद :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आता मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. ही निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार असल्याचे संकेत शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने दिले आहेत.
जिल्हा बँकेची निवडणूक २१ मार्च रोजी होत आहे. त्यामुळे राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली अाहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास अाघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी घेतला अाहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दिली.
जिल्हा बँकेवर सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, मागील निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनीही संचालक मंडळात स्थान मिळवले हाेते. त्यावेळी भाजप-शिवसेनेची सत्ता असल्याने बागडेंनी नितीन पाटील यांना भाजपच्या गोटात आणून हे राजकीय डावपेच यशस्वी केले हाेते.
मात्र, आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतही अाघाडीनेच निवडणुका लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर हाेत आहे. त्यामुळेच काळे आणि दानवे यांनी ही निवडणूक एकत्रित लढवून भाजपला बाहेर ठेवण्याची तयारी केली आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविराेध हाेईल, असे मावळते अध्यक्ष नितीन पाटील म्हटले आहे. परंतु ती फ़क़्त एक वल्गना असून भाजपच्या सर्व संचालकांना घरी बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रणनीती आखली असल्याचे महाविकास आघाडीने सांगितले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य