Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’प्रकरणी राज्यपालांचे ठाकरे सरकारला पत्र; विचारला ‘त्यावर’च थेट प्रश्न

मुंबई :

Advertisement

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच चर्चेत असतात. अनेकजणांना ते सहजपणे भेटत असतानाच महाविकास आघाडीच्या राज्य सरकारची कोंडी करण्याच्या निमित्ताने ते बातम्यामध्ये असतात. आताही त्यांनी ठाकरे सरकारला पत्र पाठवले आहे.

Advertisement

 रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक कधी घेताय, अशी विचारणा करणारे पत्र कोश्यारी यांनी राज्य सरकारला नुकतेच पत्र पाठवले आहे. मागच्या आठवड्यात राज्यपालांबाबत विमान अवमान प्रकरण घडले होते. त्यांनतर राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संबंध आणखी ताणलेले आहेत. 

Advertisement

दोन्ही घटक आपापल्या पद्धतीने एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे या पत्राच्या उत्तरात वेगळी मेख मारून ठेवण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

Advertisement

चालू अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत तारीख निश्चित करायची व राज्यपालांना कळवायची. त्याच पत्रासोबत विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त जागांची शिफारस मंजूर करा असे त्या पत्रात राज्यपाल लिहिण्याची तयारी झालेली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Advertisement

राज्यपालांनी आता नियमांवर बोट ठेवत विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसंदर्भात सरकारकडे विचारणा केली आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष नेमला जाणार आहे. मात्र, को आणि कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार हेच अजूनही आघाडी सरकारला ठरवणे शक्य झालेले नाही.

Advertisement

दि.१ मार्चपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. विधानसभा उपाध्यक्ष हे अधिवेशन पार पाडतील, पुढच्या अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा सरकारचा घाट होता. राज्यपालांनी यासंदर्भात विचारणा केल्याने सरकारची अडचण झाली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply