Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनी करावे फ्रुट ब्रँडिंग; पहा डाळिंब जी आय मानांकनाबाबत काय म्हटलेय तज्ञांनी

सोलापूर :

Advertisement

शेतकऱ्यांनी आता या स्पर्धेच्या जगात अजिबात मागे न राहता आपल्या फळांचे ब्रँडिंग करून मग विक्री करण्याची आवश्यकता आहे. सोलापूर डाळिंब जी आय मानांकन प्रचार व प्रसिद्धीसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तज्ञांनी हे मत मांडले आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग माढा, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ व पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर डाळिंब जी आय मानांकन प्रचार व प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. अरण येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

हांडे म्हणाले की, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी अनार नेटवर स्वतःकडे डाळिंब पीक असल्याची नोंदणी करावी. आपल्या जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. फळबाग ही निर्यातीच्या दृष्टिकोनातून जोपासून आर्थिक फायदा करून घ्यावा, त्यासाठी डाळिंब पिकाचे क्षेत्र चिन्हांकन करून घ्यावे.

Advertisement

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, कृषी व्यवसाय पणन तज्ञ आदित्य माने, भारत शिंदे, शिवाजी कांबळे, प्रा. प्रशांत कुंभार, विजय शिंदे, डाळिंब उत्पादक संघाचे बाळासाहेब देशमुख, प्रताप काटे, विठ्ठल कवठे, संजय पाटील, हरिदास थोरात, प्रशांत डोंगरे, सूर्यभान जाधव, उत्कर्ष देशमुख, भाऊसाहेब काटे, अनिल फरतडे, हरिदास थोरात, विठ्ठल कवठे, संजय पाटील, लक्ष्मण गायकवाड आदि उपस्थित होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply