Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : थेट आफ्रिकेच्या किलीमांजारो पर्वतावरही शिवजयंतीचा डंका..!

सोलापूर / पुणे :

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्या होणाऱ्या जयंतीची धूम जगभरात आहे. अशावेळी आफ्रिका खंडातील सर्वाधिक उंच असलेल्या किलीमांजारो पर्वतावरही शिवजयंतीचा डंका वाजणार आहे.

Advertisement

तिरंगा व भगवा ध्वज फडकावून तसेच महाराष्ट्रातील पाच गड – किल्ल्यांवरच्या मातीचे पूजनही किलीमांजारोच्या शिखरावर करण्यात येणार आहे. आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारोवर १९ फेब्रुवारीला चढाई करणार असून या मोहिमेत आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होणार आहे, असे महाराष्ट्राचा गिर्यारोहक अक्षय जंगम यांनी सांगितले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, माझ्यासाठी व पूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. चढाईवेळी पाच किल्ल्यांवरची माती, महाराजांची मूर्ती माझ्यासाठी सर्वोच्च प्रेरणा असणार आहे.

Advertisement

या मोहिमेचे आयोजन आनंद बनसोडे यांनी आपल्या ३६० एक्सप्लोररमार्फत केले आहे. आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून, याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलीच भारतीय मोहीम घेऊन जाण्याचा मान ३६० एक्सप्लोररच्या नावावर आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply