चेन्नई :
पुद्दुचेरी येथे बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेम, दया, क्षमा आणि शांती या गुणांचा वापर आवश्यक असल्याचा संदेश दिला आहे. एका विद्यार्थ्याने त्यांचे वडील व दिवंगत पंतप्रधान राजीव यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यास उत्तर दिले.
लिट्टेने तुमच्या वडिलांची हत्या केली होती याबद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. त्यावेळी त्यांनी ‘वडील राजीव गांधी यांची हत्या घडवणाऱ्यांना मी क्षमा केली आहे’, असे म्हटले.
एका महिला हल्लेखोराने २१ मे १९९१ रोजी एका प्रचार सभेत राजीव गांधी यांची चेन्नईजवळील श्रीपेरुंबुदूरमध्ये हत्या केली होती. त्यावेळी देशाला मोठा धक्का बसला होता. लिट्टे या दहशतवादी संघटनेचे हे कृत्य होते.
त्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, माझ्या मनात कोणाबद्दलही राग किंवा तिरस्काराची भावना नाही. मी माझ्या वडिलांना गमावले आहे. तो माझ्यासाठी अतिशय कठीण काळ होता. मला खूप दु:ख झाले, परंतु संताप आला नाही. हिंसाचार तुमचे काहीही हिरावून घेऊ शकत नाही. माझे वडील माझ्यात जिवंत आहेत. ते माझ्या माध्यमातून बोलत आहेत.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक