धक्कादायक : जयंत पाटलांनंतर ‘हे’ मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह; भाजपच्या ‘त्या’ खासदारालाही कोरोनाची लागण
दिल्ली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
जयंत पाटील यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
अशातच आता अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. बुधवारी झालेल्या सह्याद्री येथील कॅबिनेट बैठकीत जयंत पाटील उपस्थित होते. त्यामुळे कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांमध्.े देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना देखील कोरोनाची लागण झाली असून आज होणारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयातील जनता दरबार त्यांनी रद्द केला आहे. कॅबिनेट बैठकीत दोन मंत्री पॉझिटिव्ह आढळल्याने इतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण पसरले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर