Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ एका कारणामुळे चीनने घेतली भारतासमोर सपशेल माघार; वाचा, संपूर्ण किस्सा थेट लेफ्टनंटच्या तोंडून

दिल्ली :

Advertisement

गेल्या वर्षापासून चीन आणि भारतात मोठा तनाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम चीनच्या विविध क्षेत्रातील उद्योगांवर झाला. केंद्र सरकारने चीनच्या कंपन्यांशी केलेले अनेक करार रद्द केले. अशातच चीनने पूर्व लडाखमधील पांगोंग (Pangong) तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील सीमा सैन्याने माघार घेतल्याचे वृत्त आहे.

Advertisement

चीनने अखेर हटवादी धोरण सोडले आणि नरमाईची भूमिका घेतली. मात्र असे काय घडले की ज्यामुळे मुजोर असलेला चीन अचानक नरमाईची भूमिका घेऊ लागला. तर याविषयी सीएनएन-न्यूज18ला दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल जोशी यांनी कारण सांगितले आहे.

Advertisement

हे होते कारण :-

Advertisement

भारत-चीनच्या अधिकार्‍यांच्या चर्चेदरम्यान सफलता मिळत नव्हती. अखेर भारतीय सैन्याला संदेश मिळाला की असे काहीतरी करायला हवे जेणेकरून चर्चेदरम्यान चीनवर दबाव येईल.

Advertisement

लगेचच भारतीय सैनिकांनी 29-30 ऑगस्टच्या दरम्यान रात्री पँगाँगच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या रेजांग ला आणि रेचिन ला या रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या शिखरांवर कब्जा केला.

Advertisement

जोशी यांनी सांगितले की हाच या सबंध प्रकरणातला टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारतीय सैन्य वर्चस्वाच्या स्थानी दिसले. यामुळे चर्चेच्या दुसऱ्या फेरीत भारताचे पारडे जड झाले आणि ड्रॅगनला मागे हटण्यावाचून काही पर्यायच उरला नाही.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply