Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चक्क ‘त्याने’ पुढाऱ्यांनाही लावलाय चुना; पहा कुठे घडली ही आश्चर्यकारक घटना..!

अहमदनगर :

Advertisement

निवडणूक लढवणारे पुढारी म्हणजे महा अवलिया. या बोटाचा थुका, त्या बोटावर करून दणक्यात फसवणूक करणारे पुढारी म्हणजे जनता आणि प्रशासन यांचे कर्दनकाळ. परंतु, अशाच पुढाऱ्यांना पैसे घेऊन चुना लावण्याची घटना निवडणूक शाखेत घडली आहे.

Advertisement

ही घटना घडली आहे पारनेर या तालुक्यात. तहसीलदार कार्यालयात नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर याचा भांडाफोड झाला आहे.

Advertisement

त्याचे असे झालेय की, निवडणूक शाखेतील कंत्राटी संगणक चालकांनी परस्परविरोधी इच्छुकांपैकी फक्त एकाच उमेदवाराने सूचवलेली नावे यादीत घुसडण्याचा शब्द आर्थिक तडजोडीतून दिला होता. प्रत्यक्षात मात्र सर्वच इच्छुकांशी त्याने आर्थिक तडजोडी करुन, सर्वांना तेच आश्वासन देऊन अशी नावे समाविष्ट केल्याचे पुढाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांचे धाबे दणाणले असून परस्पर विरोधी उमेदवाराने समाविष्ट केलेल्या नावांवर हरकती नोंदवण्यासाठी, त्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

Advertisement

प्रारुप मतदारयादी १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली. २२ पर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात फ़क़्त प्रभाग ४ मधील नगरसेविकांनी सर्वात जास्त १३७ नावावर हरकती नोंदवल्या आहेत.

Advertisement

यावर डॉ. सुनीता कुमावत (मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर) यांनी म्हटले आहे की, शहरातील किमान दीड हजार नावांचा गोंधळ झाला आहे. हरकतींनुसार स्थळपाहणी करुन मतदार संबंधित प्रभागातील रहिवासी आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. संबधित प्रभागात रहिवासी असल्याचे पुरावे घेण्यात येतील.

Advertisement

पारनेरचे रहिवासी नसलेले, तालुक्यातील, तसेच तालुक्याबाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे मतदारयादीत घुसडल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाच्या निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार, कर्मचारी, तसेच खासगी संगणकचालकांना हाताशी धरून व प्रभागस्तर अधिकाऱ्यांवर दबाव टाकून इतर गावांतील नागरिकांची नावे घुसडण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन परगावच्या नागरिकांची नावे रद्द करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply