पुणे :
कोरोनाचे थैमान पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. बारामती, पुणे आणि इतर काही मोठमोठ्या शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.
अशातच दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रक्षा खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी हॉटेल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स आणि मंगल कार्यालयांना यांना इशारा दिला आहे. या सर्व ठिकाणी गर्दी टाळली जावी आणि कोरोना रोखण्यासाठीच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शेखर गायकवाड यांनी म्हटले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मोठी बातमी…. ‘भारत बंद’ आंदोलनात पडली फुट; ‘त्या’ संघटनेने अशी घेतली भूमिका
- तब्बल ‘एवढे’ व्यापारी देणार भारत बंदची हाक; वाचा, काय असणार सुरू आणि कशाला असेल टाळे
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित