मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज पंतप्रधान मोदींना चीन अतिक्रमण या विषयावरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच भाजप नेत्यांवर शेलक्या आणि हलक्या शब्दात टीका करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-
पन्नास वर्षांपूर्वी चीनने जमीन घेतली म्हणून आजची घुसखोरी माफ होत नाही. कालचे काल, आजचे बोला! पण अखेर एक वर्षाने चीनप्रश्नी सरकारला कंठ फुटला. चीनचे सैन्य ‘पँगाँग’वरून परत जात आहे व त्याचे राजकीय सोहळे सुरू झाले आहेत.
पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणी किनाऱयावरून सैन्य माघारीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. म्हणजे किती मोठय़ा संख्येने हे लाल सैन्य आपल्या हद्दीत घुसले होते याची कल्पना यावी. रणगाडे, तोफा, मोठा शस्त्र्ासाठा घेऊन चिनी सैनिक लडाखमध्ये घुसले.
घुसखोरी करताना जो संघर्ष झाला त्यात आमचे 20 जवान कामी आले. आता जो माघारीबाबत समझोता झाला त्यानुसार चीनचा कायमस्वरूपी तळ आता फिंगर 8 च्या पूर्वेला तर हिंदुस्थानी सैन्याचा फिंगर 3 वर असेल.
आपली एक इंचही जमीन चीनला गेली नाही, आपण काहीही गमावलेले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. राजनाथ सिंह यांनी संसदेत चीनच्या माघारीसंदर्भात निवेदन केले तेव्हा पक्षभेद विसरून सगळय़ांनीच बाके वाजवून संरक्षणमंत्र्यांचे अभिनंदन केले, पण विरोधी पक्षाला सरकारला काही प्रश्न विचारायचे होते, ते विचारू दिले गेले नाहीत. विरोधकांनी प्रश्न विचारले असते तर असे काय आभाळ कोसळले असते? राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे सांगून संसदेचे तोंड बंद केले. प्रश्न इतकाच आहे की, चीनचे सैन्य आमच्या हद्दीत इंचभरही घुसलेले नाही, विरोधक भ्रम आणि अफवा पसरवत आहेत, असे जे गेले वर्षभर सरकारतर्फे सर्वच पातळय़ांवर सांगितले गेले, त्या सर्व थापाच होत्या असेच आता स्पष्ट झाले आहे. चिनी सैन्य माघार घेत असल्याचा उत्सव सरकारनेच सुरू केला.
याला कुणी विजयाचा उत्सव म्हणत असतील तर त्यांचे मेंदू तपासायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षेबाबत ही बनवाबनवीच सुरू असेल तर काय करायचे?
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव