Take a fresh look at your lifestyle.

सगळं खरं पण ‘तो’ प्रश्न अजूनही अनुत्तरित; वाचा, शिवसेनेने उपस्थित केलेला तो ‘लॉजिकल’ सवाल

मुंबई :

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात आज पंतप्रधान मोदींना चीन अतिक्रमण या विषयावरुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच भाजप नेत्यांवर शेलक्या आणि हलक्या शब्दात टीका करण्यात आली आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात :-

Advertisement

चीनचे हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेले सैन्य माघारी जात आहे या घटनेचा राजकीय उत्सव सुरू झाला आहे. वर्षभर चिनी सैन्याने आमच्या जमिनीवर वीसेक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. त्या संघर्षात आमचे 20 जवान गलवान व्हॅलीत शहीद झाले. सैनिकांच्या बलिदानावर विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडले.

Advertisement

या काळात पंतप्रधानांसह भाजपचे अनेक नेते व मंत्री अनेक फुटकळ विषयांवर बोलत राहिले, पण चीनच्या घुसखोरीवर प्रश्न विचारले की, पलायन करीत. शेवटी चारेक दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती देऊन चीनशी समझोता झाल्याचे जाहीर केले.

Advertisement

पंतप्रधान मोदी हे दोन महिन्यांपूर्वी सांगत होते, चीनने आमच्या हद्दीत अजिबात घुसखोरी केलेली नाही. तेच पंतप्रधान आता चीनने आपली जमीन मोकळी केल्याचे सांगत आहेत. म्हणजे चीनने घुसखोरी केली हे सत्य होते व पंतप्रधान देशाशी खोटे बोलत होते.

Advertisement

आता या विषयाचा जो राजकीय विजयोत्सव सुरू आहे तो गमतीचा आहे. खूप मोठे शौर्य गाजविल्याचा प्रचार व प्रसिद्धी मोहिमा राबविल्या जात आहेत. पंतप्रधानांच्या मते जे सैन्य आमच्या हद्दीत कधी घुसलेच नव्हते ते सैन्य कसे माघारी जात आहे, ‘पँगाँग’लगतची चिनी बांधकामे कशी उद्ध्वस्त केली आहेत याच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या जात आहेत.

Advertisement

पँगाँग परिसरात चिन्यांनी ठोकलेले तंबू काढले जात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली जात आहेत.

Advertisement

चीन माघारी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हिंदुस्थानी संरक्षण खात्याच्या मुत्सद्देगिरीचा हा विजय आहे हे मान्य, पण चीन घुसखोरी प्रकरणात देशाचे राज्यकर्ते सतत खोटे का बोलत राहिले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. संसदेत विरोधकांना यावर प्रश्न विचारू दिले नाहीत. राहुल गांधींनी काही प्रश्न चीनसंदर्भात उपस्थित केले की, पन्नास वर्षांपूर्वी तुमच्या पणजोबांमुळे चीनने हिंदुस्थानची जमीन कशी घेतली वगैरे थडगी उकरण्यातच राज्यकर्ते धन्यता मानत राहिले. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply