Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची संधी : ‘ती’ बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी भारतात देणार आणखी 23 हजार नोकऱ्या..!

पुणे :

Advertisement

सध्या करोनाच्या लाटा येत असतानाही पुन्हा एकदा जनजीवन आणि आर्थिक चक्र सुरळीत होण्यासाठीच्या प्रयत्नात आहे. अशावेळी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासह मोठी ग्रोथ साधण्याच्या उद्देशाने अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंटने भारतात तब्बल 23 हजार पदांची भारती करण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

यात फ्रेशर्स आणि अनुभवी अशा दोन्ही कर्मचार्‍यांना संधी मिळणार आहे. कॉग्निझंट इंडियाचे सीएमडी राजेश नंबियार यांनी ही माहिती दिली आहे. भारतात सध्या कंपनीचे दोन लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. यावर्षी ही कंपनी भारतात 23,000 हून अधिक नवीन पदवीधरांची भरती करेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

नंबियार म्हणाले की, भारत हा कॉग्निझंटचा नेहमीच महत्वाचा भाग होता आणि कायमच राहील. २०२० मध्ये कॉग्निझंटकडे भारतातील सर्वात मोठी कामगार संख्या होती. अभियांत्रिकी, विज्ञान, व्यवस्थापन आणि इतर कौशल्य भरतीच्या बाबतीत आम्ही भारतातील अव्वल कंपनी म्हणून कायम राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply