18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट; वाचा, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी होणार पाऊस
पुणे :
सध्या कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.
राज्यात पुण्यानंतर आता विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, महाराष्ट्रासह देशात 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल.
१८ तारखेला मात्र खान्देशसह नगर, नाशिक आणि पुण्याला पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. काही भागात १९ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
काल गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात गारपिटीची नोंद झाली. आज कोकणात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर 19 फेब्रुवारीला मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य