Take a fresh look at your lifestyle.

भयंकरच की.. ‘त्या’ किरकोळ कारणाने अडकले आहे 15 एम्स हॉस्पिटलचे बांधकाम..!

दिल्ली :

Advertisement

देशभरात करोना नावाच्या विषाणूचा कहर जोमात आहे. अशावेळी अजूनही आरोग्याची दुरवस्था कायम आहे. विश्वगुरू बनण्याच्या गप्पा मारणाऱ्या भारतीयांना आरोग्याचे साधेसोपे प्रश्नही सुटेनासे झाल्याचे वास्तव अमर उजाला या राष्ट्रीय दैनिकाने उघडकीस आणले आहे. देशभरातील 15 एम्स हॉस्पिटलचे काम रोखण्यासाठी अगदीच किरकोळ कारणे असल्याचे समोर आलेले आहे.

Advertisement

महाराष्ट्रासह इतरही राज्यात एम्ससारख्या संस्था स्थापन करण्यास विलंब झाला आहे. या दफ्तर दिरंगाईचे कारण शोधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपली कागदपत्रे पलटवल्यावर अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक कारणे समोर आली आहेत. काही राज्याने एम्स होण्याच्या वेळी वीज कनेक्शन दिले नाही, तर कुणाला पाणी देण्यास नकार दिला आहे. एम्स बनवण्यासाठी काही राज्यांनी एम्स बनवलेल्या ठिकाणी आवश्यकतेसाठी वाळू उपलब्ध करून दिली नाही. किंवा साधी मातीही देण्यास उशीर केला आहे. अशी एक किंवा अनेक आश्चर्यकारक कारणे समोर आली आहेत, ज्यामुळे एम्ससारख्या संस्था सुरू होण्यास विलंब होत आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील नागपुरात जिथे असे अद्ययावत एम्स रुग्णालय होत आहे तिथे इलेक्ट्रिक हाय-टेंशन वायर आहेत. त्या काढणे आणि पाणी पाईप व नाल्यांचे विस्थापन करण्याची तसदी स्थानिक प्रशासन, महापालिका व राज्य सरकारने घेतलेली नाही. परिणामी येथील रुग्णालयाचे बांधकामदेखील लांबणीवर पडले आहे.

Advertisement

पंतप्रधान आरोग्य संरक्षण योजनेंतर्गत गेल्या काही वर्षांत देशातील अनेक राज्यांमध्ये एम्ससारखी संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे 2021 ते 2025 पर्यंत सुरू झालेल्या 15 संस्थांचे काम लांबणीवर पडल्याचे या अहवालात स्पष्ट झाले आहे.

Advertisement

या अहवालात असे आढळले आहे की आंध्र प्रदेशातील मंगलागिरी येथे एम्स बांधण्यासाठी राज्य सरकारने वाळूपुरवठा केला नाही. याशिवाय पाणीपुरवठा गरजादेखील निर्धारित वेळेत पूर्ण केली गेली नाहीत. त्याचा परिणाम संस्थेच्या स्थापनेस उशीर होत आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गावात म्हणजे गोरखपूरमध्ये एम्स होत आहे. इथेही उशीर झाला आहे. जमीन मिळण्यास उशीर झाल्यामुळे इथे काम प्रगतीत येऊ शकलेले नाही. आतापर्यंत गुवाहाटीमध्ये एम्सचे केवळ एक तृतीयांश बांधकाम पूर्ण झाले आहे.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या अहवालात असे म्हटले आहे की जिथे एम्स बनवायचे होते तेथे माती वेळेत भरली गेली नव्हती. परिणामी हा प्रकल्प लांबणीवर पडला. वीज, पाणी, गटारी, माती, वाळू आणि इतर किरकोळ कारणांनी एम्स रुग्णालयांचे काम अडकल्याचे वास्तव आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply