Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. गुंतवणूकदार मालामाल, तीन दिवसात 1 लाखांचे झाले थेट 1.75 लाख..!

मुंबई :

Advertisement

शेअर बाजारात कधी कोणता शेअर कोणाला मालामाल करेल आणि कोणाची धूळधाण करील याची काहीही खात्री नसते. आताही फ़क़्त 3 दिवसात तीन सरकारी बँकांनी शेअर बाजारात अप्पर सर्किटला तोडून गुंतवणूकदारांना तब्बल 74 टक्क्यापर्यंत ग्रोथ दिली आहे.

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. या काळात काही समभाग 56 ते 75 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच 3 दिवसांत गुंतवणूकदारांच्या समभागातील रक्कम 1 लाख रुपयांवरून थेट 175000 रुपयांवर गेली आहे.

Advertisement

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्येही तिसर्‍या दिवशी 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिची किंमत तीन दिवसांत 13.90 रुपयांवरून 24 रुपयांवर गेली आहे. या कालावधीत हा शेअर 74 टक्क्यांनी वाढला आहे.

Advertisement

त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँकेकडे गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी अप्पर सर्कीट 20 टक्के लागले. या 3 दिवसात हा शेअर 11 रुपयांवरून थेट 19 रुपयांवर आला. तीन दिवसांत हा 72 टक्क्यांनी महागला आहे.

Advertisement

बँक ऑफ इंडियाचीही चांदी झाली आहे. तीन दिवसांत या शेअरची किंमत 58.6 रुपयांवरून 93.10 रुपयांवर गेली आहे. या स्टॉकने तीन दिवसात गुंतवणूकदारांना 58 टक्के परतावा दिला आहे.  तर, बँक ऑफ महाराष्ट्र आज जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 25.21 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत बँकेचा शेअर 16 रुपयांवरून 25 रुपयांवर गेला. ही वाढ 57 टक्के आहे.

Advertisement

खासगीकरणाच्या बातमीनंतर 4 बँकांच्या यादीसह इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचीही चमक वाढली आहे. गुरुवारीदेखील ही धूम सुरूच आहे. गेल्या तीन व्यापार सत्रांमध्ये निफ्टी पायसू बँक निर्देशांकात 14% ची वाढ नोंदली गेली.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply