मुंबई :
अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले आहेत. बेझोस यांनी चक्क टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, जेफ बेझोसची संपत्ती 19100 करोड़ डॉलर म्हणजेच सुमारे 14.10 लाख कोटी रुपये आहे.
दरम्यान टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे एलोन मस्क आता दुसर्या स्थानावर गेले आहेत. तर भारताचे मुकेश अंबानी आता या यादीत पहिल्या दहामध्येही नाहीत. मुकेश अंबानींनाही मोठा झटका बसला आहे.
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, मंगळवारी टेस्ला शेअर्स 2.4 टक्क्यांनी घसरून 796.22 डॉलरवर बंद झाला. यामुळे इलोन मस्क यांच्या संपत्तीत 4.58 अब्ज डॉलरची म्हणजेच 458 करोड़ डॉलरची कमी आली आहे.
आता त्यांची एकूण संपत्ती 19000 करोड़ डॉलर आहे. आणि अगदी थोड्याच फरकाने ते दुसर्या स्थानावर आले आहेत. जेफ बेझोस गेल्या तीन वर्षांपासून अव्वल क्रमांकावर होते. परंतु अलीकडेच एलोन मस्कने एक नंबर मारल्याने बेजोस हे दुसर्या क्रमांकावर गेले आहेत. मुकेश अंबानी हे पहिल्या 10 श्रीमंतात नाहीत.
- जेफ बेजोस: 19100 करोड़ डॉलर
- एलन मस्क: 19000 करोड़ डॉलर
- बिल गेट्स: 13700 करोड़ डॉलर
- बनॉर्ड अरनॉल्ट: 11600 करोड़ डॉलर
- मार्क जुकरबर्ग: 10400 करोड़ डॉलर
- झांग शानशन: 9740 करोड़ डॉलर
- लैरी पेज: 9740 करोड़ डॉलर
- सर्जेई बिन: 9420 करोड़ डॉलर
- वॉरेन बफे: 9320 करोड़ डॉलर
- स्टीव बाल्मर: 8760 करोड़ डॉलर
- मुकेश अंबानी: 7970 करोड़ डॉलर
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य