आता ट्विटरनेही सुरू केली ‘ती’ भन्नाट आणि फायद्याची सुविधा; भारतासह ईतर काही देशात सुरू झाले फीचर
दिल्ली :
ट्विटर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट मेसेजेसमध्ये एक नवीन व्हॉइस मेसेज फीचर सादर केले आहे. आता ट्विटर युजर्स व्हॉईस मेसेज पाठवू शकतात. जो जास्तीत जास्त 140 सेकंदापर्यंत पाठवता येणार आहे.
हे वैशिष्ट्य Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले गेले आहे. सध्या भारत, ब्राझील आणि जपानसह निवडक देशांसाठी हे नवीन वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
नवीन फीचरविषयी बोलताना ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी म्हणाले की, ट्विटरसाठी भारत हा अग्रक्रम असलेला देश आहे. म्हणूनच आम्ही सतत नवीन वैशिष्ट्यांची चाचणी तिथे घेत आहोत आणि नवीन सेवेविषयी लोकांचे अनुभव ऐकून शिकत आहोत.
लोकांना आपल्या भावना आता थेट व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून व्यक्त करता येतील. एवढेच नाही तर या फीचरमुळे थेट भावना समजून घेण्यासही मदत होईल.
अशा प्रकारे ट्विटरवर पाठवा व्हॉईस मेसेज :-
- Android युजर्स व्हॉईस रेकॉर्डिंग चिन्हावर टॅप करुन नवीन चॅटवर व्हॉईस संदेश पाठवू शकतात.
- एकदा ऑडिओ मेसेज संपल्यावर त्यांना आयकॉनवर टॅप करून पुन्हा पाठवावे लागेल.
- आयओएस वापरकर्त्यांना मेसेज दाबून ठेवणे आणि रेकॉर्ड करणे देखील पर्याय आहे. .
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!