पुणे :
कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटातून मार्ग करण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. अनेक लोक सुरक्षित आणि फायदेशीर असणारी स्कीम गुंतवणूक करण्यासाठी शोधत असतात.
आज आम्ही तुम्हाला सुरक्षित आणि भन्नाट अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत. ज्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ तर होणारच आहे. तसेच सुरक्षितताही मिळणार आहे. कारण ही योजना पोस्ट ऑफिसची आहे.
किसान विकास पत्र असे या योजनेचे नाव आहे. या सरकारी योजनेत कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही.
वाचा या योजनेविषयी सर्वकाही मुद्देसूद :-
- किमान 1000 रुपयांत KVP योजनेत गुंतवणूक करता येईल.
- 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन आणि मानसिक दुर्बल व्यक्तीच्या नावे केव्हीपीमध्ये एकट्याने किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करता येते.
- KVP मध्ये नामनिर्देशन सुविधा आहे.
- प्रमाणपत्र एका व्यक्तीच्या नावावरून दुसर्याच्या नावावर आणि एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.
- या योजनेंतर्गत कोणतीही खाती उघडता येतील.
असा मिळणार फायदा :-
- 6.9 टक्के व्याज
- गुंतवणूक केल्यावर आपले पैसे 124 महिन्यांच्या कालावधीत (10 वर्षे आणि 4 महिने) दुप्पट होतील.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘अशी’ झाली सुरुवात; वाचून नक्कीच वाटेल अभिमान
- प्रविण दरेकरांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे ‘ही’ आग्रही मागणी; वाचा, नेमकं काय म्हणालेत ते
- बाजारभाव अपडेट : टोमॅटोच्या भावातही हलकीशी घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6000 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव