भारतात पहिल्यांदाच घडणार फाशीची ऐतिहासिक घटना; वाचा, तिने केलेल्या चित्तथरारक गुन्ह्याची कथा आणि संपूर्ण प्रकरण
मुंबई :
तुम्हाला हेडिंग वाचून थोडेसे आश्चर्य वाटले असेल पण हे खरे आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजवर एकाही महिलेला थेट फाशीची शिक्षा झालेली नाही. शक्यतो महिला गंभीर गुन्हा करण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.
अशातही एखाद्या महिलेकडून गंभीर गुन्हा घडल्यास आणि फाशीची शिक्षा झाल्यास राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या दयेच्या अर्जानंतर अनेकदा फाशी रद्द होते. अर्थात तरीही गंभीर गुन्ह्याला गंभीर शिक्षा ही मिळतेच.
मात्र आता भारतात पहिल्यांदाच एका महिलेला अत्यंत गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा होणार आहे, एवढेच नाही तर तिनेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखीलया महिलेचा दयेचा अर्ज फेटाळला आहे.
अशी झाली होती घटना :-
उत्तर प्रदेशमध्ये राहणार्या शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबन एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांचे अनेक वर्ष प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला.
धर्म एकच असला तरी जाती वेगळ्या होत्या. त्यामुळे शबनमने थेट त्यांना मारण्याचा कट रचला.
अशा प्रकारे केला तब्बल 6 जणांचा खून :-
शबनमने जेवणातून आपल्या कुटुंबीयांना झोपीची औषध दिले. त्यानंतर शबनमने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबातील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहिण राबिया यांचा समावेश होता.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!