दिल्ली :
भारतातला सगळा काळा पैसा नष्ट करणार, देशातील प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता आणणार, असे विविध आश्वासने दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना समस्त भारतीयांनी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली.
देशात नोटबंदी झाली, नोटा बदलल्या गेल्या, मात्र काळा पैसा नष्ट झाला किंवा कमी झाला, असे अजूनही लोकांना वाटत नसताना मोदींनी मात्र एक वेगळाच विषय समोर आणला आहे.
तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस आणि सरकार यातील दरी कमी झाली आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला आहे, असे मोदींनी सांगितले. नास्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरम यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हे काळा पैसा संपण्याचे हे लॉजिक सांगितले आहे.
मात्र खरे बघता जेव्हापासून व्यवहार डिजिटल झाले, तेव्हापासून सायबर क्राइमच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्याचे समजत आहे. तसेच काळ्या पैशांचे अनेक व्यवहार अजूनही अनेक ठिकाणी दैनंदिन वापरत होत असतात. मात्र मोदीजींनी सांगितले तर खरेच असेल, असे आपण मानुयात.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ले. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेकडो सरकारी सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत.
कोरोना संकटात विज्ञान आणि तंत्रज्ञानाता आपले सिद्धत्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. काही काळापूर्वीपर्यंत आपण लसींसाठी इतरांवर अवलंबून असायचो. मात्र, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारताने स्वतःची कोरोना लस तयार केली आणि अनेक देशांना आपण ती पाठवत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक