Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण; वाचा, काय आहे ताजे दर

पुणे :

Advertisement

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. यात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली आहे. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याचांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून घसरण  झाली आहे.

Advertisement

मध्ये 1-2 दिवस सोन्याच्या दरात हलकीशी वाढ झाली. मात्र आता पुन्हा घसरण होत असल्याचे समोर आले आहे. आज सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. आज दहा ग्राम सोन ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement

ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५६ हजार २०० पर्यंत पोहचला होता. तेव्हापासून आजपर्यंत सोनं प्रति तोळा नऊ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Advertisement

सोन्याच्या दरात सध्या चालू असलेली घसरण ही किरकोळ ग्राहकांसाठी मात्र खरेदीची संधी आहे. एसएमसी ग्लोबलच्या कमॉडिटी विश्लेषक वंदना भारती यांनी सांगितले की,  बॉण्ड यिल्डमध्ये जोपर्यंत घसरण होत नाही तोवर सोन्याच्या तेजीसाठी पोषक वातावरण तयार होणार नाही.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply