Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ दिवशी महाराष्ट्रात होऊ शकतात अनेक पेट्रोलपंप बंद; वाचा, काय आहे विषय

पुणे :

Advertisement

जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीला टेकलेले आहेत. प्रीमियम किंवा पॉवर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. या रोजच्या वाढत्या इंधन दरामुळे तुम्ही महागाईने परेशान झालेले असाल, हे आम्हाला माहिती आहे. मात्र पेट्रोलपंपवाल्यांचीही अवस्था तुमच्यासारखीच झालेल आहे.

Advertisement

ते एका वेगळ्या आणि मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर अजूनही जुन्याच मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्समध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्यामुळे (100 पेक्षा जास्त) पंपचालकांना प्रीमियम किंवा पॉवर पेट्रोलची विक्री थांबवावी लागली.

Advertisement

सकाळी पेट्रोल पंप सुरू करताना तेथील पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करणाऱ्या सर्व युनिटचे कॅलिब्रेशन करून नवीन दर त्यात फीड करावे लागतात. ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल यूनिट हे डिजिटल आहे, तिथे मात्र गैरसोय होत नाही. मात्र, ज्या पेट्रोल पंपावर टॅट सुनो ही प्रणाली वापरत आहेत. त्या पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये १०० आकडा टाईपच करता येत नाही.

Advertisement

अशा कठीण प्रसंगी पेट्रोलपंप बंद ठेवण्यावाचून पेट्रोलपंप चालकांना पर्याय उरणार नाही. यासाठी आपण पुणे शहराचे उदाहरण घेऊ, पुणे जिल्ह्यात जवळपास ५५० पेट्रोल पंप असून अनेक ठिकाणी टॅट सुनो ही प्रणाली वापरण्यात येत आहे. त्या ठिकाणी शंभर आकडा युनिटवर येत नसल्याने पेट्रोल पंपचालकांना तशी युनिट बंद ठेवावी लागणार आहे.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply