Take a fresh look at your lifestyle.

मिथुनदाच्या भेटीला थेट RSS चीफ; पश्चिम बंगाल निवडणुकीत नवा ट्विस्ट..?

मुंबई :

Advertisement

सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या भेटीला थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत गेलेले आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला चीत करण्यासाठी भाजपच्या मदतीला आता संघ सरसावाल्याची त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे.

Advertisement

मंगळवारी सकाळी मोहन भागवत हे मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या मुंबई निवासस्थानी भेट देण्यासाठी आले होते. पश्चिम बंगालमधील निवडणुकांपूर्वी झालेल्या या बैठकीची बरीच चर्चा रंगली आहे.

Advertisement

मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये येऊ शकतात अशीही अटकळ आहे. याआधीही मिथुनबद्दल असे अहवाल आले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची भेट झाली होती. नागपूरमधील कार्यालयात ही बैठक झाली होती.

Advertisement

मिथुन यांनी संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले होते. त्यावेळी अभिनेत्याने मोहन भागवत यांना मुंबईच्या अक्सा बीचमध्ये आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्याला आताच नेमका योग आल्याने ही चर्चा जोरात सुरू झालेली आहे.

Advertisement

मिथुन चक्रवर्ती तृणमूल कॉंग्रेसकडून पश्चिम बंगालमधील राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. तब्येत बिघडल्यामुळे आणि सभागृहात सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांनी 2016 मध्ये राज्यसभेचा राजीनामा दिला होता.

Advertisement

काही काळापूर्वी मिथुन चक्रवर्ती आपल्या एका वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मसूरीमध्ये होते. मसूरी येथे झालेल्या शूटिंगच्या वेळी त्यांची तब्येतही खालावली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. होते.

Advertisement

नुकताच तो राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ’12 ओ क्लॉक’ या हिंदी चित्रपटात फ्लोरा सैनी, मानव कौल, मकरंद देशपांडे आणि कृष्णा गौतम यांच्या समवेत दिसला. मिथुन विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटामध्ये मिथुन पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि पुनीत इस्सार यांच्यासमवेत दिसणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply