Take a fresh look at your lifestyle.

IMP News : राज्यपालांमुळे निर्माण झालाय पेच; पहा नेमके कुठे अडलेय घोडे..!

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीचे सरकार यांच्यामध्ये संवाद कमी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. राज्यपाल अनेकांना सहजपणे भेटत असतानाही राज्य सरकारची कोंडी होणारे काही निर्णय त्यांनी घेतलेले नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.

Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या १२ नामनियुक्त सदस्यांच्या नावाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त असल्याने संवैधानिक पेच निर्माण झाला आहे, हा पेच राज्यपालांच्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #politics #trending #Krushirang https://t.co/zUlXJPL1XB” / Twitter

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, विधानसभेचा अध्यक्ष असताना विधिमंडळाच्या समित्या तयार केल्या होत्या. नामनियुक्त सदस्य आल्यावर त्या समित्या पूर्ण होणार होत्या. पण चार महिने झाले. राज्यपाल यांनी मंजुरी दिली नसल्याने समित्यांवरची १२ सदस्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे विधिमंडळ समित्यांचे सध्या जे कामकाज सुरु आहे ते संवैधानिक आहे की असंवैधानिक आहे.

Advertisement

एकूणच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद यामुळे पुन्हा-पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply