Take a fresh look at your lifestyle.

केंद्र सरकार ‘त्या’ App वर मेहेरबान; माहितीचं प्रमुख माध्यम बनवणार, वाचा कसा वाजतोय स्वदेशीचा डंका

दिल्ली :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये बिनसलेले आहे. शेतकरी आंदोलना दरम्यान आपल्या मनासारखी भूमिका न घेतल्याने केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिला होता. दरम्यान ट्विटरनेही काहीसे नाक मुरडत केंद्र सरकारचे म्हणने मान्य केले.

Advertisement

सध्या आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मोहीम जोरात चालू आहे. याच अंतर्गत KOO App ट्विटरला पर्याय म्हणून गाजत आहे. अगदी काल अभिनेत्री कंगणा रानावतनेही KOO App चे कौतुक करत ट्विटरवर निशाणा साधला होता.

Advertisement

आता  केंद्र सरकार आता लवकरच कू (KOO) या अ‍ॅपला संपर्कांचं प्रमुख माध्यम बनवण्याच्या तयारीत आहे. News18ने आपल्या विश्वासू सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आवश्यक असलेली सर्व माहिती 1 ते 3 तास अगोदर देईल.

Advertisement

त्यानंतर संबंधित माहिती ट्वीटरवर पोस्ट केली जाईल. ट्वीटर आणि सरकार यांच्यात शेतकरी आंदोलनावरून वाद सुरू झाला आहे.

Advertisement

संबंधित सोशल मीडिया व्यासपीठावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्याला देशातील कायद्याचं पालन करावं लागेल. आम्ही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी तयार आहोत.

Advertisement

आमचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळेल, हे सुनिश्चित करणे, अशी माहिती कूचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी दिली.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply