Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘तिथे’ लोकांनी केला नदीतून प्रवास; 700 लोकांना घेऊन गेलेले जहाज उलटले, ‘इतके’ बेपत्ता तर 60 जणांचा मृत्यू

दिल्ली :

Advertisement

भारतात अनेकदा रस्ते खराब असल्याने अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. ज्यात लोकांनी रस्त्याचा प्रवास टाळायचा म्हणून जहाजाने नदीतून प्रवास करण्याचे ठरविले आणि तेच अंगाशी आले आहे.

Advertisement

कांगो देशातील माई-नोमडबे प्रांतात तब्बल 700 लोकांनी खचाखच भरलेले एक जहाज उलटले असून तब्बल 100 जण बेपत्ता आहे. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Advertisement

कांगो देशातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. या देशात बहुतांश लोक हे रस्त्याने प्रवास करण्याऐवजी नदीच्या मार्गाने प्रवासाचा मार्ग निवडतात. मात्र अनेकदा जहाजात क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यास अशा दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते.

Advertisement

या घटनेत ७०० पैकी ३०० जणांना वाचविण्यात यश आले.  माय-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोटी गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. ही घटनाही क्षमतेपेक्षा अधिक लोक जहाजात चढल्याने घडली आहे.

Advertisement

कांगो देशाचे मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माई-नोमडबे प्रांतातमध्ये ही घटना घडली. ते जहाज किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाले होते. माय-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोटी गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे जहाज उलटले.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply