Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

जामखेड :

Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शहरात आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. शिवाजीनगर भागात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी १०५ उपस्थितांनी रक्तदान करून आपले सामाजिक योगदान दिले. प्रशांत काका राळेभात मित्र मंडळातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने आ. रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला साद देत आम्ही या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे युवा नेते प्रशांत काका राळेभात यांनी सांगितले. याला कार्यकर्त्यांनी भरगोस प्रतिसाद दिल्याने राळेभात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisement

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे दत्ता वारे, निलेश गायवळ, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, हनुमंत मुरूमकर, शहाजी राळेभात, पवन राळेभात, चंद्रकांत राळेभात, लक्ष्मण ढेपे यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply