Take a fresh look at your lifestyle.

मगच डाळिंब शेती होईल यशस्वी; पहा मोहोळ येथील ‘शेतकरी प्रथम’मध्ये काय उमटला सूर

सोलापूर :

Advertisement

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना यांच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत डाळिंब तेलकट डाग रोग व्यवस्थापन या विषयावर एक दिवासीय कृषी अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कृषी तज्ञांनी आपापले मत व्यक्त करून यशस्वी डाळिंब शेतीचा मूलमंत्र सांगितला.

Advertisement

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉक्टर तानाजी वळकुंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, पाणी व्यवस्थापन, डाळिंबावर पडणाऱ्या विविध रोगांबाबत शेतकऱ्यांनी मार्गदर्शन मिळवून कृषी विभागांतर्गत तज्ञांकडून डाळिंब पिकातील बारकाव्याबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देऊन कृषी विद्यापीठ व विविध शासकीय संशोधन संस्थांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.

Advertisement

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय कृषी विकास योजना-शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत डाळिंब तेलकट डाग रोग व्यवस्थापन प्रात्यक्षिकांची गरज, कार्यप्रणाली, निष्कर्ष आणि शेतकऱ्यापर्यंतचे प्रत्याभरण याबाबत माहिती दिली. तांत्रिक सत्रात डॉ. मल्लिकार्जुन यांनी डाळिंब पिकातील तेलकट डाग व कीड व्यवस्थापन या विषयी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेली शिफारशी बाबत अद्ययावत माहिती दिली. डॉ. पंकज मडावी यांनी डाळिंब पिकातील बुरशीजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.

Advertisement

कृषी विज्ञान केंद्र, मोहोळच्या वतीने सन २०१६-१७ पासून ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना – शेतकरी प्रथम’ प्रकल्पांतर्गत डाळिंब तेलकट डाग रोग व्यवस्थापनावर प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत फवारणी वेळापत्रकाचा अवलंब केल्याने तेलकट डाग रोग प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी राहून, उत्पादन खर्चात बचत झाली.

Advertisement

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक तथा विषय विशेषज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अतुल ढवळे, हर्षद निगडे आदी उपस्थित होते. 

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply