Take a fresh look at your lifestyle.

तर आंदोलकांना तुरुंगवास; इंटरनेट बंदसह रस्त्यांवर सगळीकडे लष्करी वाहने, पहा ब्रह्मदेशातली परिस्थिती

दिल्ली :

Advertisement

भारताच्या शेजारील म्यानमार (ब्रह्मदेश) देशात लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा एकदा लष्करशाहीचे सरकार आलेले आहे. त्यामुळे देशात ठिकठिकाणी आंदोलन चालू आहे. त्यांना वठणीवर आणण्याच्या हेतूने मग सगळीकडे लष्करी वाहने तैनात केली गेली आहेत.

Advertisement

म्यानमारमध्ये लष्करी तख्तपालटाविरोधातील आंदोलन तीव्र झाले असून त्या सर्वांचे लक्ष्य चीनचे सरकार आहे. परिणामी घाबरलेल्या लष्करी सत्तेने ते चिरडून काढण्यासाठी रणगाडे तैनात केले आहेत. लष्कराच्या चिलखती गाड्या रस्त्यावर गस्त घालत असल्याने स्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.

Advertisement

 लष्कराने देशभरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना इशारा दिला आहे की, जर सशस्त्र दलाच्या कारवाईत व्यत्यय आणला तर त्यांना २० वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.  येथील नेमकी परिस्थिती अजूनही जगासमोर स्पष्ट झालेली नाही. मात्र, लष्कराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आव्हान दिल्याचे चित्र आहे.

Advertisement

म्यानमारसाठीचे संयुक्त राष्ट्राचे विशेष अधिकारी टॉम अँड्र्यूज यांनी सांगितले, लष्कराने देशातील लोकांविरोधात युद्ध पुकारल्यासारखे वाटत आहे. अर्ध्या रात्रीही छापेमारी केली जात आहे, लोकांना अटक केली जात आहे. त्यांच्या हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. इंटरनेट पुन्हा बंद करण्यात आले आहे. लष्कराचा ताफा निवासी भागात जात आहे. देशातील सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्या अटकेनंतर देशभरात आंदोलन सुरू आहे. सू की यांची सुटका करण्याची लोकांची मागणी आहे.

Advertisement

तर, बीबीसीच्या एका वृत्तात म्हटले आहे की, लष्करी नेत्यांविरोधात द्वेष वा अवमाननेसाठी प्रेरित करणाऱ्यांनाही दीर्घ कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. एकूणच लष्करी सरकारने देशावरील पकड मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न केले आहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply